Monday, 21 August 2017

बाप ।।।

लहानपण बापाच्या हाता खांद्यावर खेळता खेळता निघुन गेले , पण जशी जशी मोठी होत गेले ,तस तस बापापासून  दूर होत गेले .व आईच्या सानिध्यात राहत गेले आई जास्त जवळची वाटत गेली . शाळा कॉलेज पर्यंत काही लागल तर ,आईकड़े साकडे घालने मग आई बापाला सांगणार, मग माज़ी मागणी पूर्ण होत असे .बाबा कामावरुन आले की दमलेले असायचे .कायम चिंतित असायचे. कधी चिड़ायाचे ,माज शिक्षण, दादाच शिक्षण , आजी आजोबच आजारपण , अश्या अनेक कारनानी ते बेचेन असायचे. परंतु ,ते दाखवत नसायचे . परंतु ते मला जाणवत असायच . बाबाशी खुप बोलावे ,त्यांच्या सहवासात रहाव ,अस अनेकदा वाटायच .परंतु बाबांच चिडका स्वभावामुळे मी त्यांच्या पासून थोड़ी दुरावत असल्याची जाणीव मला होत होती. मला घरी यायला जरी उशीर जाला तर, माज्यावर खुप चिडायके , रागवायचे . मलाही त्यांचा खुप राग यायचा .मी कित्येक दिवस त्यांच्या सोबत बोलत नसायचे. अस वाटायच बाबा किती कठोर आहेत ? त्यांच्याशी काही बोलायला भीती वाटायला लागली . अस वाटायच ,त्यांच काहीच माज़्यावर प्रेम नाही. ते माजा नेहमीच तिरस्कार करतात .पण तो माजा भ्रम होता . मी न जेवता रागात जोपी जायचे, तर ते सुद्धा, न जेवता जोपायच. ह्या पासून मी अनभिन्न असायचे . आयुष्यात इतक्या अडचणी आल्या, संकट आली ,परंतु त्यांच्या डोळ्यात मी कधी अश्रु आलेले पहिले नाही . पण ज्या दिवशी ,माज लग्न जाल त्या दिवशी मात्र मला गळ्याशी घेऊन बारीक मुलासाराख डसाडसा रडले . त्यांच्या या वागन्याने मी भारावून गेले . बाबा माफ करा ,  मी तुम्हाला इतके दिवस समजु शकले नाही . कठोर तुम्ही नाही .मी होते . निष्काळजी तर मी होते , तुम्ही तर आजपर्यत माजी काळजी घेतली . आईच प्रेम दिसायच पण ,तुमच कधी दिसल नाही . मला वाटत प्रत्येक बाप हा असाच असतो . मी सासरी घेल्यानंतर ,बाबा खुप खचले, बेचेन जाले , अन्न पान्याकडे , कामाकडे लक्ष नाही . माहेरी आले तेव्हा कळल .मी गेल्या पासून बाबा आजारी पडलेत. त्यांनी आई दादाला सांगून ठेवल होत .मी आजारी आहे हे तिला कळवू नका. तिच लग्न जालय , हे दिवस तिच्यासाठी खुप आनंदाचे आहेत. तिला आंनद घेऊ दया . बाबा ...….  आजपर्यंत मी देव कधी पहिला नाही इतके दिवस तो तुमच्या स्वरुपात माज्या समोर होता परंतु, तो मला कधी कळला नाही   .                                                                                .                                                                       बाळा पवार ( नाशिक न्यूज़ मीडिया  9881903111)

No comments:

Post a Comment