Monday, 21 August 2017

जोगवा

विजयकुमार दळवी यांनी लिहिलेल्या ` जोगवा ’ हि कादंबरी नुकतीच वाचली . मानसिक गुलामगिरीच्या उद्द्वस्ततेचे प्रभावी चित्रण या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्यात आलाय .
२१ व्या शतकात वावरताना अंधश्रद्देचे प्रमाण अजून कमी होताना दिसत नाही . श्रद्धा ठीक परंतु अंधश्रद्धा काय कामाची ?
आज काल देव देवतांच महत्व कमी होत असून , भोन्दुबाबांनी आपले बस्तान बसवले आहे . भोन्दुबाबांच्या मागे स्वताला सुशिक्षित म्हणून घेणारेच धावत आहेत . तेथील देणगी पेट्या नोटांनी तुडूंब भरत आहेत . नोकरीत व व्यवसायात गरिबांना लुटायचे आणि समाधानासाठी भोन्दुबाबांच्या पायावर लोटांगण घालणारी नवी पिढी उदयास येऊ घातली आहे .
देवी यल्लामाच्या मानसिक  कल्पनेतून , लहान मुला - मुलींना नवस फेडण्यासाठी देवीला सोडून श्री व पुरुष्याच  आंख  आयुष्य शापित करण्याचा हा डाव . जोगवा मागायला लावून शरीराच बाजार मांडायला लावणारा हा समाज पापी का पुण्यवान ?
मागे २-३ वर्षापूर्वी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंभ कुलकर्णी यांनी अहमदनगर जिल्यातील अकोले तालुक्यात अशीच एक घटना प्रकाशात आणली होती .व तसा त्या निष्पाप मुलीला त्यांनी  न्याय मिळून दिला . या कादंबरीत असणार सरपंच व अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्ते देशपांडे याचं पात्र काही प्रमाणात हेरंब कुलकर्णी सरांशी मिळत-जुळत आहे .
जोगवा कादंबरी खूप कलात्मक रीतीने लिहिली घेली आहे . विशेष म्हणजे या कादंबरी वर मराठी चित्रपट जोगवाची निर्मिती करण्यात आली आहे .
रिया पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेली हि कादंबरी आपण जरूर वाचा तुम्हाला नक्की आवडेल .
.............................................................................................................................................................................................................................................................................
फोटो कादंबरी व चित्रपटातील आहेत . बाळा पवार नाशिक न्यूज balapawar111@gmail.com 98819031111.             https://m.facebook.com/story.php?story_fbid=1567482313273002&id=651394361548473

No comments:

Post a Comment