Sunday 3 September 2017

अधर्माचा बाजार

अधर्माचा बाजार
सध्या  देश्यात विविध अधर्मी बाबांचा प्रस्थान वाढताना दिसतंय .डॉ.नरेंद्र दाभोळकर हमीद व मुक्ता दाबोळकर यांनी केलेलं अंधश्रद्धा निर्मुलनावर केलेले काम कौतुकास्पद आहे . परंतु त्यांचे हे कार्य निष्फळ ठरत कि काय ? असा प्रश्न निर्माण होतोय  .
काही दिवसापूर्वी आपल्या आश्रमातील सांध्वीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी बाबा राम रहीम सिंग याला सन्माननीय. न्यायालयाने २० वर्ष्याची शिक्षा ठोठावली . ज्या पिढीत रंणरागीनीने आपल्या जीविताची पर्वा न करता कोर्टात साक्ष दिली . व या नरादमाला त्याची खरी जागा दाखवून दिली त्या रणरागीणीला सलाम !
आसाराम बापू , बाबा रामपाल , स्वामी परमहंस , कृपाळू महाराज , राधे माँ असे डोंगी बाबा निर्माण होण्याला जबाबदार कोण ? या बाबांनी आपापल्या भोगोलिक क्षेत्रात इतके प्रस्थान बसविले आहे कि , यांच्या आलिशान आश्रमात जाऊन प्रख्यात राजकारणी , मंत्री ,पोलीस अधिकारी ,चित्रपट अभिनेते ,नामांकित खेळाडू या बाबांना लोटांगण घालतात . त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लाखो करोडो रुपयांची देणग्या आश्रमांना देतात . मंत्री या आश्रमांना अनेक सवलती देतात .कर माफ करतात . पोलीस अधिकारी संरक्षण पुरवितात . या मोबदल्यात बाबा आपल्या भक्तांना या राजकीय पक्ष्यांना मतदान करण्याचे फर्मान सोडतात .भक्त म्हणजे या राजकीय मंडळींचा वोट बँक निवडणुका आल्या कि आपोआप राजकीय नेत्यांचे पाय आपोआप या बाबांच्या आश्रमाकडे वळतात . यातून एकमेकांचे हित जोपासले जातात .
मग काय ? सुरु होतो या स्वयम घोषित बाबांचा हैदोस सर्व यंत्रणा आपल्या खिश्यात असल्याने आश्रमात सुरु होतो धार्मिकतेच्या नावावर अंधश्रदेचा बाजार . अनैतिकतेचा व्यापार , कोमजले जातात अनेक निष्पाप देह , अनेक चिमकुले जीव बाबांच्या वासनेचे  बळी ठरतात .
आपल्या स्वार्थासाठी हि राजकीय मंडळी  , स्वयंघोषित धर्मगुरू ,सर्व सामान्याचा छळ करतात . हे अजून किती काळ आपण सोसणार ?
आज गतीला न्याय व्यवस्था सर्व सामन्यांचा आधार आहे . उशिरा का होईना पिडीताना न्याय मिळाला .
या पुढे अश्या घटनांना आळा बसावा बाबा संस्कृती बंद व्हावी अस वाटत असेल तर समाज्यातील सर्व घटकांनी डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मुलनाचा वसा आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायला हवा .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाळा पवार नाशिक न्यूज ९८८१९०३११११ . BALAPAWAR111@GMAIL.COM
लेख आवडला असेल टार नक्की शेअर करा . फेसबुक पेज ला पुढील लिंक वर जाऊन अवश्य भेट दया .https://m.facebook.com/story.php?story_fbid=1585927011428532&id=651394361548473

No comments:

Post a Comment