Monday 21 August 2017

बाप ।।।

लहानपण बापाच्या हाता खांद्यावर खेळता खेळता निघुन गेले , पण जशी जशी मोठी होत गेले ,तस तस बापापासून  दूर होत गेले .व आईच्या सानिध्यात राहत गेले आई जास्त जवळची वाटत गेली . शाळा कॉलेज पर्यंत काही लागल तर ,आईकड़े साकडे घालने मग आई बापाला सांगणार, मग माज़ी मागणी पूर्ण होत असे .बाबा कामावरुन आले की दमलेले असायचे .कायम चिंतित असायचे. कधी चिड़ायाचे ,माज शिक्षण, दादाच शिक्षण , आजी आजोबच आजारपण , अश्या अनेक कारनानी ते बेचेन असायचे. परंतु ,ते दाखवत नसायचे . परंतु ते मला जाणवत असायच . बाबाशी खुप बोलावे ,त्यांच्या सहवासात रहाव ,अस अनेकदा वाटायच .परंतु बाबांच चिडका स्वभावामुळे मी त्यांच्या पासून थोड़ी दुरावत असल्याची जाणीव मला होत होती. मला घरी यायला जरी उशीर जाला तर, माज्यावर खुप चिडायके , रागवायचे . मलाही त्यांचा खुप राग यायचा .मी कित्येक दिवस त्यांच्या सोबत बोलत नसायचे. अस वाटायच बाबा किती कठोर आहेत ? त्यांच्याशी काही बोलायला भीती वाटायला लागली . अस वाटायच ,त्यांच काहीच माज़्यावर प्रेम नाही. ते माजा नेहमीच तिरस्कार करतात .पण तो माजा भ्रम होता . मी न जेवता रागात जोपी जायचे, तर ते सुद्धा, न जेवता जोपायच. ह्या पासून मी अनभिन्न असायचे . आयुष्यात इतक्या अडचणी आल्या, संकट आली ,परंतु त्यांच्या डोळ्यात मी कधी अश्रु आलेले पहिले नाही . पण ज्या दिवशी ,माज लग्न जाल त्या दिवशी मात्र मला गळ्याशी घेऊन बारीक मुलासाराख डसाडसा रडले . त्यांच्या या वागन्याने मी भारावून गेले . बाबा माफ करा ,  मी तुम्हाला इतके दिवस समजु शकले नाही . कठोर तुम्ही नाही .मी होते . निष्काळजी तर मी होते , तुम्ही तर आजपर्यत माजी काळजी घेतली . आईच प्रेम दिसायच पण ,तुमच कधी दिसल नाही . मला वाटत प्रत्येक बाप हा असाच असतो . मी सासरी घेल्यानंतर ,बाबा खुप खचले, बेचेन जाले , अन्न पान्याकडे , कामाकडे लक्ष नाही . माहेरी आले तेव्हा कळल .मी गेल्या पासून बाबा आजारी पडलेत. त्यांनी आई दादाला सांगून ठेवल होत .मी आजारी आहे हे तिला कळवू नका. तिच लग्न जालय , हे दिवस तिच्यासाठी खुप आनंदाचे आहेत. तिला आंनद घेऊ दया . बाबा ...….  आजपर्यंत मी देव कधी पहिला नाही इतके दिवस तो तुमच्या स्वरुपात माज्या समोर होता परंतु, तो मला कधी कळला नाही   .                                                                                .                                                                       बाळा पवार ( नाशिक न्यूज़ मीडिया  9881903111)

जोगवा

विजयकुमार दळवी यांनी लिहिलेल्या ` जोगवा ’ हि कादंबरी नुकतीच वाचली . मानसिक गुलामगिरीच्या उद्द्वस्ततेचे प्रभावी चित्रण या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्यात आलाय .
२१ व्या शतकात वावरताना अंधश्रद्देचे प्रमाण अजून कमी होताना दिसत नाही . श्रद्धा ठीक परंतु अंधश्रद्धा काय कामाची ?
आज काल देव देवतांच महत्व कमी होत असून , भोन्दुबाबांनी आपले बस्तान बसवले आहे . भोन्दुबाबांच्या मागे स्वताला सुशिक्षित म्हणून घेणारेच धावत आहेत . तेथील देणगी पेट्या नोटांनी तुडूंब भरत आहेत . नोकरीत व व्यवसायात गरिबांना लुटायचे आणि समाधानासाठी भोन्दुबाबांच्या पायावर लोटांगण घालणारी नवी पिढी उदयास येऊ घातली आहे .
देवी यल्लामाच्या मानसिक  कल्पनेतून , लहान मुला - मुलींना नवस फेडण्यासाठी देवीला सोडून श्री व पुरुष्याच  आंख  आयुष्य शापित करण्याचा हा डाव . जोगवा मागायला लावून शरीराच बाजार मांडायला लावणारा हा समाज पापी का पुण्यवान ?
मागे २-३ वर्षापूर्वी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंभ कुलकर्णी यांनी अहमदनगर जिल्यातील अकोले तालुक्यात अशीच एक घटना प्रकाशात आणली होती .व तसा त्या निष्पाप मुलीला त्यांनी  न्याय मिळून दिला . या कादंबरीत असणार सरपंच व अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्ते देशपांडे याचं पात्र काही प्रमाणात हेरंब कुलकर्णी सरांशी मिळत-जुळत आहे .
जोगवा कादंबरी खूप कलात्मक रीतीने लिहिली घेली आहे . विशेष म्हणजे या कादंबरी वर मराठी चित्रपट जोगवाची निर्मिती करण्यात आली आहे .
रिया पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेली हि कादंबरी आपण जरूर वाचा तुम्हाला नक्की आवडेल .
.............................................................................................................................................................................................................................................................................
फोटो कादंबरी व चित्रपटातील आहेत . बाळा पवार नाशिक न्यूज balapawar111@gmail.com 98819031111.             https://m.facebook.com/story.php?story_fbid=1567482313273002&id=651394361548473

Sunday 20 August 2017

अॅडॉल्फ हिटलर महत्वकांक्षी प्रशासक

मंदाकिनी भारद्वाज  यांनी लिहिलेलं `अॅडॉल्फ हिटलर महत्वकांक्षी प्रशासक ` हे पुस्तक वाचनात आल .
हिटलर १२ वर्षे जर्मनीचा प्रशासक होता . त्याच्या कार्यकाळाची परिणीती दुसऱ्या महायुद्धात झाली . या युद्धात लाखो लोक मारले गेले . याच कारणास्तव हिटलरची दुष्ट ,व्यक्ती म्हणून गणना करण्यात आली .

जर्मनीची सध्य परिस्थिती बदलून जगाच्या राजकारणात सर्वोच्च स्थान मिळवून देऊन जागतिक महासत्ता गाजविण्याचा त्याचा प्रयत्न होता .

बालपण , किशोरवयीन जीवन त्याने खूप एकटेपणाने घालविली असल्याने त्याचा परिणाम त्याचा स्वभावात झालेला दिसतो .त्याचा मनात ज्यू लोकांविषयी असणारा संताप व त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे शेवटी त्याला आत्महत्या कराव लागल . एका महान प्रशासकाचा असा शेवट होण काळजाला भिडणार आहे .

मंदाकिनी भारद्वाज यांच्या लिखाणामुळ दुसऱ्या महायुद्धाच चित्र डोळ्यासमोर उभ राहत .
हिटलरच्या आत्मह्त्तेन हेच शिद्द  होत कि , युद्धाने विकास होवू शकत नाही . अहंकार तुमची बुद्धी भ्रष्ट करून विचारशक्ती कमकुवत करते .

रिया पब्लिकेशन्स हे पुस्तक जरूर वाचा खूप काही शिकण्यासारख आहे . तुम्हाला नक्की आवडेल . खास करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्त्याना .....

 .................................................................................................................................................................
बाळा  पवार नाशिक न्यूज ९८८१९०३१११ . balapawar111@Gmail.com                                                पुढील वर जाऊन माझ्या फेसबुक पेज ला अवश्य भेट द्या .....https://m.facebook.com/story.php?story_fbid=1436401729785268&id=100002463644709