Tuesday 7 November 2017

ज्वाला संघर्ष्याच्या

ज्वाला संघर्ष्याच्या

आज स्वतंत्र हिंदुस्तानला  ७० वर्षे पूर्ण होत असताना , आम्ही खऱ्या अर्थान स्वतंत्र झालो  का ? किंबहुना तो आम्हाला मिळालाय का असा प्रश्न निर्माण होतो . स्वतंत्र हिंदुस्तानात आजही आमच्या प्राथमिक गरजांसाठी     ( अन्न,वस्र,निवारा ) यासाठी संघर्ष करावा लागतोय .देशातील रोज करोडो लोग उपाशीपोटी झोपतात .

बालमजूर , शेतमजूर , उसतोडणी कामगार , यांची तर दयनीय अवस्था आहेच , परंतु आदिवासी ,व नक्षली भागातील समुदायाला तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे .विकासाच मॉडेल मांडनाऱ्याना कदाचित यांचा विसर पडलाय कि ? हा त्यांचा डोळेझाक आहे  हे कळेनास झालाय .

भटक्या विमुक्त , दिन दलितांच्या समस्या तर भयानक आहेत . इंग्रजांच्या काळात ज्या जातींना  चोर ठरवलं गेल ते आजही चोर म्हणून संबोदले जातात . ज्यांचा जगण्याला तर काही अर्थ नाही पारंपारिक चोरीचा व्यवसाय सोडवा अस वाटत असताना प्रस्थापित यंत्रणा ,  कायदे व्यवस्था , व समाज त्यांना सुधारू देत नाही . पाथरवट , पारधी , आदिवासी परिस्थिती पाहून मन अचंभित होत . आजही या समाज्यात जन्माला आलो म्हणून ते नशिबाला दोष देतात .

स्वतंत्र हिंदुस्तानच्या पंतप्रधान स्व.इंदिराजी  गांधी यांनी  पंतप्रधान असताना गरिबी हटाओ चा नारा दिला .  त्यांच्या नंतर अनेक पंतप्रधान झाले परंतु आजही गरिबी कायम आहे . गोचीडासारखी  चीटकलेली . स्वतंत्र हिंदुस्तानात आजही रोजगार योजना राबवून रोजगाराची हमी आम्हाला द्यावी लागते . हि आमच्या स्वतंत्र हिंदुस्तानासाठी शोकांतिका आहे .........

मोठ्या कौतूकान महिला दिन देश्यात साजरा केला जातो . परंतु आज महिलांसाठी अशी परिस्थिती आहे का ? आजही पुरुषी अहंकाराचे , वासनेचे , दररोज  बळी पडतात . आजचे सर्व वृत्तपत्र याच बातम्यांनी भरलेले असतात . अल्पवयीन मुलीवर बलत्कार , विवाहितेवर बलत्कार , शाळेत जाणाऱ्या मुलीवर बलत्कार , हुंड्यासाठी पेठवून देणे , मुलगी झाली म्हणून बाळतीन बाईला लाता बुक्क्यांनी मारण , शाळकरी मुलीवर बलत्कार करून तिच्या शरीराचे लचके तोडण हे राजरोसपने स्वतंत्र हिंदुस्तानात अजून सुरूच आहेत . हिंदुस्तानातील सरकारी इस्पितळातील जळीत वार्डात गेल्यावर याची प्रचीती आपणाला येईल .

मराठा समाज्यात जन्मलो . छत्रपती शिवराय यांच वारसदार म्हणून आम्ही  समाज्यात मोठ्या दिमाखान वावरत होतो . परंतु या ७० वर्ष्यात या राज्यकर्त्यांनी वोट बँक म्हणून आमचा वापर केला . आमच्या बलत्कारी बहिणीला न्याय मिळावा म्हणून . समस्त महिला वर्गाला लाखोंचा समुदाय घेऊन रस्त्यावर उतरावं लागतेय  . आरक्षण मागाव लागतंय . वर्षानुवर्षे तोंड गप्प ठेऊन फक्त आश्वासनांचा पाऊस आमच्यावर पडतो आहे .

भ्रस्टाचार , व लाचेच म्हणाल तर , पोटच्या पोरासारख हक्क सांगितला जातो .  मग काय निमुटपणे द्याव लागत . शेतकरी , समद्या जगाचा पोशिंदा  तोच उपाशी पोटी झोपतोय . एकाच आशेने उद्या तरी स्वतंत्र हिंदुस्तानात  बळीराजाच  राज्य येईल.

..................................................................................................................................................................................................................................................................
Bala pawar nashik news 9881903111/ balapawar111@gmail.com