Tuesday 19 June 2018

लवकरच दंडकारण्य अभियानास सुरुवात - सौ हेमलता पिचड

अकोले - दंडकारण्य अभियान मागील वर्षी प्रमाणे या वर्षी राबविण्यात येणार असल्याची माहिती राजूरच्या सरपंच तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षा सौ हेमलताताई पिचड यांनी सांगितले . या निमित्ताने अकोले येथे बैठकीचे आयोजन केले होते .या वेळी अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्ष संगीता शेटे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल देशमुख , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पवार राष्ट्रवादी च्या महिला अध्यक्षा सौ धुमाळ , सौ कल्पनाताई सुरपुरिया , प्राचार्य विद्याचंद्र सातपुते , मानवअधिकार कार्यकर्ते बाळा पवार , देशमुख सर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जे.डी .गोंडके, संगीता पोले , राजुर विभागाचे वनक्षेत्र अधिकारी श्री दिलीप जाधव उपस्थित होते . गेल्या वर्षी स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने 40 हजार वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यात आले होते .या वर्षी 50 हजार वृक्ष लावण्याचे नियोजन असून , याची सुरुवात तालुक्यातील बदगी बेलापूर, शिरपुंजे , मावशी , गोंदुशी या गावातून होणार आहे .27 जून रोजी वटपौर्णिमा मुहूर्तावर या कार्यक्रमाची सुरुवात करण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले . या वेळी प्रास्तविक बाळा पवार यांनी केले तर आभार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी मांडले .

अकोले तालुक्यात दंडकारण्य अभियानास लवकरच सुरुवात - सौ हेमलताताई पिचड     .

अकोले तालुक्यात दंडकारण्य अभियानास लवकरच सुरुवात - सौ हेमलताताई पिचड     .                                                                                                 अकोले - दंडकारण्य अभियान मागील वर्षी प्रमाणे या वर्षी राबविण्यात येणार असल्याची माहिती राजूरच्या सरपंच तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षा सौ हेमलताताई पिचड यांनी सांगितले . या निमित्ताने अकोले येथे बैठकीचे आयोजन केले होते .या  वेळी अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्ष संगीता शेटे , राष्ट्रवादी च्या महिला अध्यक्षा  सौ धुमाळ , सौ कल्पनाताई सुरपुरिया , प्राचार्य विद्याचंद्र सातपुते , मानवअधिकार कार्यकर्ते बाळा पवार , देशमुख सर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जे.डी .गोंडके, संगीता पोले , राजुर विभागाचे वनक्षेत्र अधिकारी श्री दिलीप जाधव उपस्थित होते . गेल्या वर्षी स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने 40 हजार वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यात आले होते .या वर्षी 50 हजार वृक्ष लावण्याचे नियोजन असून  , याची सुरुवात तालुक्यातील बदगी बेलापूर, शिरपुंजे , मावशी , गोंदुशी या गावातून होणार आहे .27 जून रोजी वटपौर्णिमा मुहूर्तावर या कार्यक्रमाची सुरुवात करण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले . या वेळी प्रास्तविक बाळा पवार यांनी केले तर आभार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी मांडले .

Saturday 16 June 2018

ज्वाला संघर्षाच्या !

आज स्वतंत्र हिंदुस्तानला ७० वर्षे पूर्ण होत असताना , आम्ही खऱ्या अर्थान स्वतंत्र झालो का ? किंबहुना तो आम्हाला मिळालाय का असा प्रश्न निर्माण होतो . स्वतंत्र हिंदुस्तानात आजही आमच्या प्राथमिक गरजांसाठी ( अन्न,वस्र,निवारा ) यासाठी संघर्ष करावा लागतोय .देशातील रोज करोडो लोग उपाशीपोटी झोपतात .

बालमजूर , शेतमजूर , उसतोडणी कामगार , यांची तर दयनीय अवस्था आहेच , परंतु आदिवासी ,व नक्षली भागातील समुदायाला तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे .विकासाच मॉडेल मांडनाऱ्याना कदाचित यांचा विसर पडलाय कि ? हा त्यांचा डोळेझाक आहे हे कळेनास झालाय .

भटक्या विमुक्त , दिन दलितांच्या समस्या तर भयानक आहेत . इंग्रजांच्या काळात ज्या जातींना चोर ठरवलं गेल ते आजही चोर म्हणून संबोदले जातात . ज्यांचा जगण्याला तर काही अर्थ नाही पारंपारिक चोरीचा व्यवसाय सोडवा अस वाटत असताना प्रस्थापित यंत्रणा , कायदे व्यवस्था , व समाज त्यांना सुधारू देत नाही . पाथरवट , पारधी , आदिवासी परिस्थिती पाहून मन अचंभित होत . आजही या समाज्यात जन्माला आलो म्हणून ते नशिबाला दोष देतात .

स्वतंत्र हिंदुस्तानच्या पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांनी पंतप्रधान असताना गरिबी हटाओ चा नारा दिला . त्यांच्या नंतर अनेक पंतप्रधान झाले परंतु आजही गरिबी कायम आहे . गोचीडासारखी चीटकलेली . स्वतंत्र हिंदुस्तानात आजही रोजगार योजना राबवून रोजगाराची हमी आम्हाला द्यावी लागते . हि आमच्या स्वतंत्र हिंदुस्तानासाठी शोकांतिका आहे .........

मोठ्या कौतूकान महिला दिन देश्यात साजरा केला जातो . परंतु आज महिलांसाठी अशी परिस्थिती आहे का ? आजही पुरुषी अहंकाराचे , वासनेचे , दररोज बळी पडतात . आजचे सर्व वृत्तपत्र याच बातम्यांनी भरलेले असतात . अल्पवयीन मुलीवर बलत्कार , विवाहितेवर बलत्कार , शाळेत जाणाऱ्या मुलीवर बलत्कार , हुंड्यासाठी पेठवून देणे , मुलगी झाली म्हणून बाळतीन बाईला लाता बुक्क्यांनी मारण , शाळकरी मुलीवर बलत्कार करून तिच्या शरीराचे लचके तोडण हे राजरोसपने स्वतंत्र हिंदुस्तानात अजून सुरूच आहेत . हिंदुस्तानातील सरकारी इस्पितळातील जळीत वार्डात गेल्यावर याची प्रचीती आपणाला येईल .

मराठा समाज्यात जन्मलो . छत्रपती शिवराय यांच वारसदार म्हणून आम्ही समाज्यात मोठ्या दिमाखान वावरत होतो . परंतु या ७० वर्ष्यात या राज्यकर्त्यांनी वोट बँक म्हणून आमचा वापर केला . आमच्या बलत्कारी बहिणीला न्याय मिळावा म्हणून . समस्त महिला वर्गाला लाखोंचा समुदाय घेऊन रस्त्यावर उतरावं लागतेय . आरक्षण मागाव लागतंय . वर्षानुवर्षे तोंड गप्प ठेऊन फक्त आश्वासनांचा पाऊस आमच्यावर पडतो आहे .

भ्रस्टाचार , व लाचेच म्हणाल तर , पोटच्या पोरासारख हक्क सांगितला जातो . मग काय निमुटपणे द्याव लागत . शेतकरी , समद्या जगाचा पोशिंदा तोच उपाशी पोटी झोपतोय . एकाच आशेने उद्या तरी स्वतंत्र हिंदुस्तानात बळीराजाच राज्य येईल.

..............................................................................................................................................
Bala pawar nashik news 9881903111/ balapawar111@gmail.com

Monday 11 June 2018

बाल मजुरी गंभीर समस्या !

      बाल मजुरी गंभीर समस्या !                                                                                                                      

१९८६ साली बाल कामगार कायदा अस्तित्वात आला . परंतु आज मितीला या कायद्याच पालन होताना दिसत नाही . १४ वर्षाखालील बालकांना आपण कुठेही कामाला ठेऊ शकत नाही . त्यांच्या मानसिक  , शारीरिक , भावनिक , विकासावर बाधा येणार नाही याची काळजी घेण अपेक्षित असताना , आज मात्र ही मुल देशात अनेक क्षेत्रात बाल कामगार म्हणून वावरताना दिसतात . बांधकाम क्षेत्र , विट – भट्टी , हॉटेलात  , कचरा जमा करण्यासाठी , या बालकांचा वापर होतो हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय . त्यातच , विविध भागात भिक मागताना  बस स्थानक ,रेल्वे स्टेशन , सिग्नल वर ही बालक सहजपणे दिसू शकतात .  विशेष म्हणजे काही प्रमाणात यात पालकांचाही पुढाकार आढळून येतो . बालमजुरीला आळा घालन शासनाची जबाबदारी तर आहेच परंतु , आपल्या सर्वांच कार्य त्यात अपेक्षित आहे . परंतु अस होताना दिसत नाही .

आपल या कडे दुर्लक्ष होतंय हे मान्य कराव लागेल . मुलांना सुट्ट्या लागल्या की , पालकांना आर्थिक मदत व्हावी या हेतून कामावर जाण पसंत करतात . पालकही अनेकदा कुटूंबाच आर्थिक उत्पन्न वाढाव या करिता कामाला पाठवितात . दारिद्र , व्यसन , कर्जबाजारीपणा , अनाथ बालक , संयुक्त कुटुंब , मालकाचा स्वंहित ही कारण ही  नाकारता येणार नाहीत  . जिथे ` बाल – श्रम ` उदर्निर्वाहाच साधन असेल तिथे आपण काही करू शकत नाही .

देशात अनेक ठिकाणी काही कालावधीसाठी  रोजगारासाठी पालकांना विस्थापित व्हाव लागत . या वेळी मुलही विस्थापित होतात . अशी मुल शाळाबाह्य तर होतातच परंतु , विस्थापित झालेल्या ठिकाणी छोटी – मोठी काम करतात . यात ऊस तोडणी कामगारांची मुल , भटक्या – विमुक्तांच्या मुलांचं उदाहरण देता येईल .

अनेकदा पालकच आपल्या लहान मुलांकडून मजुरी करून घेतात . त्यांना त्याच काहीच वाटत नाही . पालकांची गरिबी , बेकारी , अशिक्षितपणा , खेड्यांमध्ये शाळेची कमतरता , ही कारणही असू शकतात . बालमजुरी खुलेआम सुरु असण्याच मूळ कारण , बाल – हक्कांच्या कायद्यांची पायमल्ली , मुलांच्या हक्कांची जाणीव व जागरुकता नसणे हीच आहेत . पालकांना मुलांच्या हक्कांची पर्वा नाही . लोकशाहीतील प्रमुख घटक राजकीय पक्ष व त्यांच्या नेतृत्वाला याची उत्कंठा नाही , नोकरशाही चुकीचे आकडे घेऊन बालमजुरी कमी झाल्याची आभास निर्माण करण्यात धन्यता मानतात . पोलीस यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात .

परंतु बालमजुरी देशाच्या बाबतीत कौतुकास्पद नाही . यासाठी सर्वागीण उपाय योजनांची व त्यांच्या अंमल बजावणीची नितांत आवश्यकता आहे . बाल मजुरी कायमची नष्ट करण्याकरिता शासन स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होऊन , जिल्हा कृती दल ,स्वयंसेवी सस्था व सर्वसामान्य जनतेचच्या  समन्वयाने  उचित कार्याची गरज आहे .                                                  

बाळा पवार 9881903111

Sunday 18 March 2018

आदरणीय दादा म्हणजे , आपले सर्वांचे लाडके बी.जे.खताळ पाटील . राज्याचे माझी सहकार , अन्न , व नागरी पुरवठा , पाठबंधारे , वीज , कृषी , परिवहन , महसूल विधी व न्याय मंत्री . अशा अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी पहिला . महाराष्ट्राच्या विकासाच्या जडण – घडणीत दादांचा खूप मोठा सिहाचा विटा आहे . येत्या २६ मार्च ला दादा शंभराव्या वर्ष्यात पदार्पण करत आहेत . या निम्मितान पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात दादांचा अभीष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्रात जे प्रभावशाली नेतृत्व निर्माण झाल ते मा. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब , वसंतराव नाईक , शंकरराव चव्हाण , वसंतदादा पाटील , ए. आर .अंतुले , यांच्या सोबत काम करून आपल्या कार्याची ओळख समस्त महाराष्ट्राला दादांनी करून दिली . दादा म्हणजे निष्कलंक , अभ्यासू , जिज्ञासू , परिवर्तनशील व्यक्तिमत्व ! दादा मला भावले यांच्या वाचन व सहित्य संस्कृतीमुळे .माझे पत्रकारितेतील मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार ,साहित्यिक डॉ संतोष खेडलेकर यांच्या तोंडून मी नेहमी दादाविषयी ऐकायचो. त्याच वाचन , दिवसाची दिनचर्या , आहार या वयातही तरुणांना लाजवेल अशी त्यांची तब्येत . सध्या राजकारण हि संकल्पना बदलताना दिसतंय . युवा वर्ग राजकारणात येताना दिसतोय परंतु , जास्त काळ ते या क्षेत्रात ठीकत नाहीत . याची कारण शोधन आवश्यक आहे . आजची युवा पिढी राजकारणाकडे वेगळ्या दृष्टीनेकोनातून पाहते आहे . म्हणून महाराष्ट्रात व देशात सक्षम नेतृत्त्व निर्माण होत नाही . दादांचा हा वारसा आपण सर्वांनी पुढे न्यायला हवा . आमदार बाळासाहेब थोरात , यशवंतराव गडाख साहेब , डॉ संजयजी मालपाणी , मधुकरराव नवले , दादांच्या वाचनाचा व साहित्याचा वारसा पुढे नेत आहेत हे अकोले – संगमनेरकरांसाठी कौतुकास्पद बाब आहे . मास मिडीया करत असताना दादांची मुलाखत घेण्याचा मानस होता .परंतु , ते शक्य झाल नाही . येणाऱ्या काळात ते शक्य होईल .दादा म्हणजे राजकारनातील अभ्यासाचे विद्यापीठ ! त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनस्वी शुभेच्या ! ------------------------------------------------------------------------------बाळा पवार नाशिक न्यूज & टाईम्स ९८८१९०३१११ .

Tuesday 7 November 2017

ज्वाला संघर्ष्याच्या

ज्वाला संघर्ष्याच्या

आज स्वतंत्र हिंदुस्तानला  ७० वर्षे पूर्ण होत असताना , आम्ही खऱ्या अर्थान स्वतंत्र झालो  का ? किंबहुना तो आम्हाला मिळालाय का असा प्रश्न निर्माण होतो . स्वतंत्र हिंदुस्तानात आजही आमच्या प्राथमिक गरजांसाठी     ( अन्न,वस्र,निवारा ) यासाठी संघर्ष करावा लागतोय .देशातील रोज करोडो लोग उपाशीपोटी झोपतात .

बालमजूर , शेतमजूर , उसतोडणी कामगार , यांची तर दयनीय अवस्था आहेच , परंतु आदिवासी ,व नक्षली भागातील समुदायाला तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे .विकासाच मॉडेल मांडनाऱ्याना कदाचित यांचा विसर पडलाय कि ? हा त्यांचा डोळेझाक आहे  हे कळेनास झालाय .

भटक्या विमुक्त , दिन दलितांच्या समस्या तर भयानक आहेत . इंग्रजांच्या काळात ज्या जातींना  चोर ठरवलं गेल ते आजही चोर म्हणून संबोदले जातात . ज्यांचा जगण्याला तर काही अर्थ नाही पारंपारिक चोरीचा व्यवसाय सोडवा अस वाटत असताना प्रस्थापित यंत्रणा ,  कायदे व्यवस्था , व समाज त्यांना सुधारू देत नाही . पाथरवट , पारधी , आदिवासी परिस्थिती पाहून मन अचंभित होत . आजही या समाज्यात जन्माला आलो म्हणून ते नशिबाला दोष देतात .

स्वतंत्र हिंदुस्तानच्या पंतप्रधान स्व.इंदिराजी  गांधी यांनी  पंतप्रधान असताना गरिबी हटाओ चा नारा दिला .  त्यांच्या नंतर अनेक पंतप्रधान झाले परंतु आजही गरिबी कायम आहे . गोचीडासारखी  चीटकलेली . स्वतंत्र हिंदुस्तानात आजही रोजगार योजना राबवून रोजगाराची हमी आम्हाला द्यावी लागते . हि आमच्या स्वतंत्र हिंदुस्तानासाठी शोकांतिका आहे .........

मोठ्या कौतूकान महिला दिन देश्यात साजरा केला जातो . परंतु आज महिलांसाठी अशी परिस्थिती आहे का ? आजही पुरुषी अहंकाराचे , वासनेचे , दररोज  बळी पडतात . आजचे सर्व वृत्तपत्र याच बातम्यांनी भरलेले असतात . अल्पवयीन मुलीवर बलत्कार , विवाहितेवर बलत्कार , शाळेत जाणाऱ्या मुलीवर बलत्कार , हुंड्यासाठी पेठवून देणे , मुलगी झाली म्हणून बाळतीन बाईला लाता बुक्क्यांनी मारण , शाळकरी मुलीवर बलत्कार करून तिच्या शरीराचे लचके तोडण हे राजरोसपने स्वतंत्र हिंदुस्तानात अजून सुरूच आहेत . हिंदुस्तानातील सरकारी इस्पितळातील जळीत वार्डात गेल्यावर याची प्रचीती आपणाला येईल .

मराठा समाज्यात जन्मलो . छत्रपती शिवराय यांच वारसदार म्हणून आम्ही  समाज्यात मोठ्या दिमाखान वावरत होतो . परंतु या ७० वर्ष्यात या राज्यकर्त्यांनी वोट बँक म्हणून आमचा वापर केला . आमच्या बलत्कारी बहिणीला न्याय मिळावा म्हणून . समस्त महिला वर्गाला लाखोंचा समुदाय घेऊन रस्त्यावर उतरावं लागतेय  . आरक्षण मागाव लागतंय . वर्षानुवर्षे तोंड गप्प ठेऊन फक्त आश्वासनांचा पाऊस आमच्यावर पडतो आहे .

भ्रस्टाचार , व लाचेच म्हणाल तर , पोटच्या पोरासारख हक्क सांगितला जातो .  मग काय निमुटपणे द्याव लागत . शेतकरी , समद्या जगाचा पोशिंदा  तोच उपाशी पोटी झोपतोय . एकाच आशेने उद्या तरी स्वतंत्र हिंदुस्तानात  बळीराजाच  राज्य येईल.

..................................................................................................................................................................................................................................................................
Bala pawar nashik news 9881903111/ balapawar111@gmail.com

Sunday 1 October 2017

आश्रमशाळेच्या विध्यार्थ्यांना गरज आहे मायेची व मार्गदर्शनाची

💐💐💐💐💐💐💐💐
केंद्रस्तरीय क्रिडास्पर्धा केळीरुम्हणवाडी.....!!! अनुदानीत आश्रमशाळा देवठाणची दैदीप्यमान कामगिरी
💐🌹🌷💐🌹🌷💐🌹
1). 17 वर्षाखालील गट(मुले) प्रथम क्रमांक (कब्बडी)
2) 14 वर्ष गट (मुले) द्वितीय क्रमांक(कब्बडी)
3) 17 वर्ष गट (मुले) द्वितीय क्रमांक (खो-खो)
4) 400 मीटर रिले- प्रथम क्रमांक
5) 200 मीटर रिले- द्वितीय क्रमांक
6) उंचउडी- हिलम विक्रम हरी (प्रथम क्रमांक)
7) लांबउडी- हिलम विक्रम हरी(प्रथम क्रमांक)
8) गोळाफेक- हिलम विक्रम हरी (द्वितीय क्रमांक)
9)200 मीटर रनिंग- हिलम विक्रम हरी(प्रथम क्रमांक)
10) 400 मीटर रनिंग- हिलम विक्रम हरी (प्रथम क्रमांक)
11) 800 मीटर रनिंग- हिलम विक्रम हरी (प्रथम क्रमांक)
12) 1500 मीटर रनिंग- हिलम विक्रम हरी (प्रथम हरी)

13) उंच उडी-  बांबळे सुजीत भाऊराव (प्रथम क्रमांक)
14) लांब उडी- बांबळे सुजीत भाऊराव (प्रथम क्रमांक)
15) उंचउडी (मुली) सोंगाळ वैशाली तुकाराम(प्रथम क्रमांक)
16) 17 वर्ष गट (मुली) - द्वितीय (खो-खो)💐🌹🌷💐🌹🌷💐🌹🌷
                 व
चैम्पियन ट्रॉफी......!!!!
💐🌹🌷💐🌹🌷💐🌹

या उतुंग यशाबद्दल  आश्रमशाळा देवठाणचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. यशस्वी खेळाडूचे मा. मधुकररावजी पिचड साहेब(माजी आदिवासी विकास मंत्री), अकोले तालुक्याचे आमदार व संस्थेचे विश्वस्त मा.वैभवरावजी पिचड साहेब,  संस्थेचे सचिव तथा विश्वस्थ श्री. भवारी सर, अध्यक्ष श्री. भरतरावजी घाणे साहेब, खजिनदार श्री. गभाले गुरूजी व सर्व संचालक मंडळ, प्रकल्प अधिकारी व सर्व अधिकारी कर्मचारी प्रकल्प कार्यालय राजूर यांनी अभिनंदन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. सदगिर एस. एन(माध्य) व बो-हाडे एस. टी (प्राथ), क्रीडा शिक्षक श्री. कानवडे सर ( प्राथ ), श्री.बाळा पवार सर ( माध्य ), सर्व शिक्षक, अधिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले...!!
💐🌹🌷💐🌹🌷💐🌹💐🌹💐🌹🌷💐🌹🌷💐🌹🌷💐🌹🌷