Sunday 18 March 2018

आदरणीय दादा म्हणजे , आपले सर्वांचे लाडके बी.जे.खताळ पाटील . राज्याचे माझी सहकार , अन्न , व नागरी पुरवठा , पाठबंधारे , वीज , कृषी , परिवहन , महसूल विधी व न्याय मंत्री . अशा अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी पहिला . महाराष्ट्राच्या विकासाच्या जडण – घडणीत दादांचा खूप मोठा सिहाचा विटा आहे . येत्या २६ मार्च ला दादा शंभराव्या वर्ष्यात पदार्पण करत आहेत . या निम्मितान पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात दादांचा अभीष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्रात जे प्रभावशाली नेतृत्व निर्माण झाल ते मा. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब , वसंतराव नाईक , शंकरराव चव्हाण , वसंतदादा पाटील , ए. आर .अंतुले , यांच्या सोबत काम करून आपल्या कार्याची ओळख समस्त महाराष्ट्राला दादांनी करून दिली . दादा म्हणजे निष्कलंक , अभ्यासू , जिज्ञासू , परिवर्तनशील व्यक्तिमत्व ! दादा मला भावले यांच्या वाचन व सहित्य संस्कृतीमुळे .माझे पत्रकारितेतील मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार ,साहित्यिक डॉ संतोष खेडलेकर यांच्या तोंडून मी नेहमी दादाविषयी ऐकायचो. त्याच वाचन , दिवसाची दिनचर्या , आहार या वयातही तरुणांना लाजवेल अशी त्यांची तब्येत . सध्या राजकारण हि संकल्पना बदलताना दिसतंय . युवा वर्ग राजकारणात येताना दिसतोय परंतु , जास्त काळ ते या क्षेत्रात ठीकत नाहीत . याची कारण शोधन आवश्यक आहे . आजची युवा पिढी राजकारणाकडे वेगळ्या दृष्टीनेकोनातून पाहते आहे . म्हणून महाराष्ट्रात व देशात सक्षम नेतृत्त्व निर्माण होत नाही . दादांचा हा वारसा आपण सर्वांनी पुढे न्यायला हवा . आमदार बाळासाहेब थोरात , यशवंतराव गडाख साहेब , डॉ संजयजी मालपाणी , मधुकरराव नवले , दादांच्या वाचनाचा व साहित्याचा वारसा पुढे नेत आहेत हे अकोले – संगमनेरकरांसाठी कौतुकास्पद बाब आहे . मास मिडीया करत असताना दादांची मुलाखत घेण्याचा मानस होता .परंतु , ते शक्य झाल नाही . येणाऱ्या काळात ते शक्य होईल .दादा म्हणजे राजकारनातील अभ्यासाचे विद्यापीठ ! त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनस्वी शुभेच्या ! ------------------------------------------------------------------------------बाळा पवार नाशिक न्यूज & टाईम्स ९८८१९०३१११ .