Tuesday, 19 June 2018

अकोले तालुक्यात दंडकारण्य अभियानास लवकरच सुरुवात - सौ हेमलताताई पिचड     .

अकोले तालुक्यात दंडकारण्य अभियानास लवकरच सुरुवात - सौ हेमलताताई पिचड     .                                                                                                 अकोले - दंडकारण्य अभियान मागील वर्षी प्रमाणे या वर्षी राबविण्यात येणार असल्याची माहिती राजूरच्या सरपंच तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षा सौ हेमलताताई पिचड यांनी सांगितले . या निमित्ताने अकोले येथे बैठकीचे आयोजन केले होते .या  वेळी अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्ष संगीता शेटे , राष्ट्रवादी च्या महिला अध्यक्षा  सौ धुमाळ , सौ कल्पनाताई सुरपुरिया , प्राचार्य विद्याचंद्र सातपुते , मानवअधिकार कार्यकर्ते बाळा पवार , देशमुख सर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जे.डी .गोंडके, संगीता पोले , राजुर विभागाचे वनक्षेत्र अधिकारी श्री दिलीप जाधव उपस्थित होते . गेल्या वर्षी स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने 40 हजार वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यात आले होते .या वर्षी 50 हजार वृक्ष लावण्याचे नियोजन असून  , याची सुरुवात तालुक्यातील बदगी बेलापूर, शिरपुंजे , मावशी , गोंदुशी या गावातून होणार आहे .27 जून रोजी वटपौर्णिमा मुहूर्तावर या कार्यक्रमाची सुरुवात करण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले . या वेळी प्रास्तविक बाळा पवार यांनी केले तर आभार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी मांडले .

No comments:

Post a Comment