Monday, 11 June 2018

बाल मजुरी गंभीर समस्या !

      बाल मजुरी गंभीर समस्या !                                                                                                                      

१९८६ साली बाल कामगार कायदा अस्तित्वात आला . परंतु आज मितीला या कायद्याच पालन होताना दिसत नाही . १४ वर्षाखालील बालकांना आपण कुठेही कामाला ठेऊ शकत नाही . त्यांच्या मानसिक  , शारीरिक , भावनिक , विकासावर बाधा येणार नाही याची काळजी घेण अपेक्षित असताना , आज मात्र ही मुल देशात अनेक क्षेत्रात बाल कामगार म्हणून वावरताना दिसतात . बांधकाम क्षेत्र , विट – भट्टी , हॉटेलात  , कचरा जमा करण्यासाठी , या बालकांचा वापर होतो हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय . त्यातच , विविध भागात भिक मागताना  बस स्थानक ,रेल्वे स्टेशन , सिग्नल वर ही बालक सहजपणे दिसू शकतात .  विशेष म्हणजे काही प्रमाणात यात पालकांचाही पुढाकार आढळून येतो . बालमजुरीला आळा घालन शासनाची जबाबदारी तर आहेच परंतु , आपल्या सर्वांच कार्य त्यात अपेक्षित आहे . परंतु अस होताना दिसत नाही .

आपल या कडे दुर्लक्ष होतंय हे मान्य कराव लागेल . मुलांना सुट्ट्या लागल्या की , पालकांना आर्थिक मदत व्हावी या हेतून कामावर जाण पसंत करतात . पालकही अनेकदा कुटूंबाच आर्थिक उत्पन्न वाढाव या करिता कामाला पाठवितात . दारिद्र , व्यसन , कर्जबाजारीपणा , अनाथ बालक , संयुक्त कुटुंब , मालकाचा स्वंहित ही कारण ही  नाकारता येणार नाहीत  . जिथे ` बाल – श्रम ` उदर्निर्वाहाच साधन असेल तिथे आपण काही करू शकत नाही .

देशात अनेक ठिकाणी काही कालावधीसाठी  रोजगारासाठी पालकांना विस्थापित व्हाव लागत . या वेळी मुलही विस्थापित होतात . अशी मुल शाळाबाह्य तर होतातच परंतु , विस्थापित झालेल्या ठिकाणी छोटी – मोठी काम करतात . यात ऊस तोडणी कामगारांची मुल , भटक्या – विमुक्तांच्या मुलांचं उदाहरण देता येईल .

अनेकदा पालकच आपल्या लहान मुलांकडून मजुरी करून घेतात . त्यांना त्याच काहीच वाटत नाही . पालकांची गरिबी , बेकारी , अशिक्षितपणा , खेड्यांमध्ये शाळेची कमतरता , ही कारणही असू शकतात . बालमजुरी खुलेआम सुरु असण्याच मूळ कारण , बाल – हक्कांच्या कायद्यांची पायमल्ली , मुलांच्या हक्कांची जाणीव व जागरुकता नसणे हीच आहेत . पालकांना मुलांच्या हक्कांची पर्वा नाही . लोकशाहीतील प्रमुख घटक राजकीय पक्ष व त्यांच्या नेतृत्वाला याची उत्कंठा नाही , नोकरशाही चुकीचे आकडे घेऊन बालमजुरी कमी झाल्याची आभास निर्माण करण्यात धन्यता मानतात . पोलीस यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात .

परंतु बालमजुरी देशाच्या बाबतीत कौतुकास्पद नाही . यासाठी सर्वागीण उपाय योजनांची व त्यांच्या अंमल बजावणीची नितांत आवश्यकता आहे . बाल मजुरी कायमची नष्ट करण्याकरिता शासन स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होऊन , जिल्हा कृती दल ,स्वयंसेवी सस्था व सर्वसामान्य जनतेचच्या  समन्वयाने  उचित कार्याची गरज आहे .                                                  

 

बाळा पवार 9881903111

No comments:

Post a Comment